Breaking News

माजी नगरसेवक राजू सोनी यांच्या प्रयत्नाने रस्ता झाला खुला

पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील नाल्याजवळ झाड तुटून पडल्याने नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता. याबाबत स्थानिक रहिवाशांनी माजीनगरसेवसक राजू सोनी यांना माहिती देताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधून झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी यांचे आभार मानले.
पनवेल शहरातील महात्मा गांधी रोडवरील मेघजी मणजी नाल्याजवळ खूप भले मोठे झाड तुटून पडले होते. त्यामुळे येथील नागरिकांचा रहदारीचा रस्ता पूर्ण पणे बंद झाला होता.त्यामुळे येथील रहिवाशांनी माजी नगरसेवसक राजू सोनी यांना फोन केला.त्यांनी त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना तेथे जाण्यास सांगितले.ते तेथे जाऊन पाहणी करून राजू सोनी यांना सांगितले. तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई यांनी तत्काळ महापालिकेच्या अग्निशमक दलाचे अधिकारी संदीप पाटील यांना सांगितले. पाटील यांनी लगेचच त्यांचे कर्मचारी पाठवले व ते झाड रस्त्याच्या बाजूला करून तो रस्ता रहदारीसाठी खुला करून दिला. त्यामुळे येथील रहिवाशांनी राजू सोनी, मंदार देसाई व अग्निशामक दलाचे कर्मचारी यांचे आभार मानले.

Check Also

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त …

Leave a Reply