पनवेल ः रामप्रहर वृत्त
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या स्थानिक आमदार निधीतून कोपर गाव येथे सामाजिक सभागृह बांधण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि.12) करण्यात आले.
आमदार महेश बालदी यांच्या माध्यमातून उरण मतदारसंघात विविध विकासकामे सुरू आहेत या अंतर्गत कोपर गावातील समाजमंदिर बांधण्याचे काम स्थानिक आमदार निधी 25.15 या अंतर्गत करण्यात येणार आहे.
भूमिपूजन समारंभास गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, सदस्य रोशन म्हात्रे, भाजप वाहतूक संघटना जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर, भाजप कोपर गाव अध्यक्ष सुधीर घरत, कोपर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष वैभव घरत, भाऊ भोईर, काशिनाथ पाटील, कमलाकर देशमुख, कमलाकर घरत, किशोर पाटील, उलवे नोड उपाध्यक्ष अनुताई घरत, इंदूताई घरत, कॉन्ट्रॅक्टर मयूर ठाकूर यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन
विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …