खोपोली ः प्रतिनिधी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबई लेनला महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. येथे सोमवारी (दि. 25) झालेल्या अपघातात तेथे देखरेख करणार्या अभियंत्याचा रोलरखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, रोडरोलरचा ऑपरेटर अपघातानंतर फरार झाला आहे.
सोमवारी एक्स्प्रेस वेवर किमी 19 येथे काम सुरू होते. आयआरबीचे उपठेकेदार कंपनीचे अभियंता मनोज आनंद जगदाळे (24) हे सदर कामाचे अभियंता म्हणून पाहणी करीत असतानाच रोलरचालकाचा रोलरवरील ताबा सुटला. यादरम्यान अभियंता मनोज रोलरखाली आला. त्यात त्याचे शरीर पूर्णपणे चेपले जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतरचे दृश्य अतिशय भयानक होते. या अपघाताची पोलिसांत नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.