Breaking News

पनवेलमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण

पनवेल महानगरपालिका

पनवेल : रामप्रहर वृत्त

प्रजासत्ताक दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेमध्ये महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभाती समीर ठाकूर, सुशीला घरत, हेमलता म्हात्रे महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, नितीन पाटील,  तेजस कांडपीळे, मुकिद काजी, नगरसेविका चारुशिला घरत, दर्शना भोईर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेचे कर्मचारी आणि मान्यवर उपस्थित होते.

पनवेल : वार्ताहर : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात यंदाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख अतिथी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी संकलनाचे प्रमुख राजीव बोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाप्रती आपल्या मानवंदना अर्पण करून भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत करण्यात आले. वेळोवेळी नागरिकांच्या समस्या सोडविल्याबद्दल विक्रांत पाटील यांचे नागरिकांनी आभार व्यक्त केले. मध्यप्रदेशहुन तयार करून घेतलेली भव्य श्रीराम मंदिराची प्रतिकृती कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरली. या कार्यक्रमाला श्रीराम मंदिर समर्पण निधी संकलन सहप्रमुख गौरव जोशी, पनवेल शहर संघचालक प्रशांत कोळी, माजी नगरसेविका नीता माळी आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

विरोधकांकडून होणारा अपप्रचार खोडून काढा; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पनवेल ः रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीप्रमाणे या विधानसभा निवडणुकीतही विरोधकांकडून स्वार्थापोटी खोटा प्रचार करून जनतेची …

Leave a Reply