
खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शनिवारी (दि. 6) 39वा भाजप स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेविका नेत्रा पाटील, तालुका चिटणीस वासुदेव पाटील, शहर सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, महिला सरचिटणीस मोना अडवाणी, सहकार सेल तालुका संयोजक रवींद्र श्रीवास्तव, सोशल मीडिया तालुका संयोजक विनय पाटील, शहर संयोजक गुरुनाथ म्हात्रे, अमर उपाध्याय, विलास आळेकर, करुणा म्हात्रे, भरत पटेल, प्रकाश, सुहास कुडगुळे, कनुभाई पटेल, जयेश पटेल, आदित्य मावळे, सत्यवान जाधव, मोहन भुजवडकर, विश्वनाथ इंडी, रामचंद्र जाधव, लखविर सिंग सैनी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस दीपक शिंदे यांनी केले. उपस्थितांना मार्गदर्शन अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केले तर आभार दिलीप जाधव यांनी केले.