Breaking News

अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

अलिबाग ः प्रतिनिधी

अलिबाग वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीचा उद्घाटन रविवारी ( दि. 6) रोजी न्याय सेवा सदन, जिल्हा व सत्र न्यायालय येथे उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नूतन इमारतीच्या कोनशिला अनावरण करून फीत कापून करण्यात आले.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता, न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई ए. ए.सय्यद, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई तथा पालक न्यायमूर्ती अलिबाग गिरीश कुलकर्णी, उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक महेंद्र चांदवाणी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, अलिबाग बार काऊन्सिलचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रविण ठाकूर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी आदी मान्यवर हे उपस्थित होते.

Check Also

पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी

पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …

Leave a Reply