Breaking News

उरणमध्ये नववर्ष शोभायात्रा

सजीव देखाव्यांची रेलचेल; मान्यवरांचा सहभाग

उरण : वार्ताहर

ज्येष्ठ नागरिक मंडळ यांच्या वतीने नूतन वर्षानिमित्त सालाबादप्रमाणे गुढीपाडवा शोभायात्रेचे आयोजन शनिवारी (दि. 6) करण्यात आले. उरण शहरातील पेन्शनर पार्क येथील उरण नगरपरिषद यांच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी शाळा येथून शोभायात्रेस सुरुवात झाली. पुढे गणपती चौक, राजपाल नाका, जरीमरी मंदिर, राघोबा मंदिर व परत राजपाल नाका, गणपती चौक, विमला तलाव, एन. आय. हायस्कूल, पेन्शनर पार्क व तेथे सांगता समारोप झाले. वादन एक कला ढोल ताशा पथक यांनी शोभायात्रेत बुलंद आवाज काढून शोभा यात्रेची शोभा वाढवली. या शोभायात्रेत आमदार मनोहरशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेवक ठाकूर, ज्योस्त्ना येरुणकर, दिलीप येरुणकर, संगिता पवार, सुजाता गायकवाड, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष रत्नाकर कुलकर्णी, सचिव विजय सुळे, सदस्य, महिला आदी सहभागी झाले होते.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply