एक ठार, 21 जखमी
माणगाव : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावर माणगावपासून 10 किमी अंतरावर असणार्या नगरोली फाटा येथे गुरुवारी (दि. 28) सायंकाळी आयशर टेम्पोने एसटी बसला ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन्ही वाहनांमधील 21 प्रवासी जखमी झाले.
चालक अनंत मोतीराम वाघमारे (वय 40, रा. भाले आदिवासीवाडी, ता. माणगाव) हा त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच-06,एक्यू-9780) मध्ये भाताचे तूस भरून कामगारांना सोबत घेऊन गुरुवारी संध्याकाळी मुंबई बाजूकडून इंदापूरकडे जात होता. माणगावजवळील नगरोली फाटा येथे टेम्पोने विरुद्ध बाजूला जाऊन समोरून येणार्या एसटी बस (एमएच-20,बीएल-0903) ला ठोकर दिली. या अपघातात टेम्पो चालक अनंत वाघमारे याचा मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनांमधील रामचंद्र यशवंत रसाळ (वय 54, रा. सोनसडे ता.तळा), अमजद शेख मकबूल शेख (वय 34, रा. भाईंदर, मूळ रा. पश्चिम बंगाल), अनिकेत अरुण गोगरकर (वय 24, रा. मंडणगड, जि. रत्नागिरी), राकेश शंकर कदम (वय 30, रा. वाशी नवी मुंबई), सतीश तुळशीराम मोरे (वय 55, रा. साकीनाका मुंबई), नथुराम सखाराम मोरे (वय 57, रा. उंबर्डी, ता. माणगाव), रवींद्र लक्ष्मण वाघमारे (वय 20, रा. भाले, ता. माणगाव), महेश हनुमंत जाधव (वय 20, रा. निवी आदिवासीवाडी, ता. माणगाव), संदीप मनोहर वाघमारे (वय 19, रा. भाले, ता. माणगाव), पोपट काटे (वय 60, रा. महाड), नाना सोळंकी (वय 68, रा. महाड), अशोक शंकर चव्हाण (वय 52, रा. पनवेल), प्रशांत शिवराम पिंपळकर (वय 33, रा. दापोली, जि. रत्नागिरी), संजय मधुकर जायले (वय 35, रा. नालासोपारा डेपो), रामनाथ जायकु मिरवळ (वय 46, रा. नालासोपारा, मूळ जि. जालना), विवेक भुवन (वय 37, रा. डहाणू), अमित नागराज जोशी (वय 42, रा. वर्तकनगर ठाणे) योगिता अनंत पाचकले (वय 35, रा. गिरगाव, मुंबई), अंकिता तुषार तटकरे (वय 25, रा. दादली किंजलघर, महाड), तुषार रामचंद्र तटकरे (वय 28, रा. दादली किंजलघर, महाड), कमल अनंत जाधव (वय 35, रा. कोपरी गाव, वाशी नवी मुंबई) हे प्रवासी जखमी झाले. या अपघाताचे वृत्त समजताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
एसटी बस चालक संजय मधुकर जायले (वय 35, नालासोपारा एसटी डेपो) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास महिला उपनिरीक्षक प्रियांका बुरुंगले करीत आहेत.
नागोठणेजवळील अपघातात एकाचा मृत्यू
नागोठणे : प्रतिनिधी
भरधाव वेगात चाललेल्या डंपर चालकाने विरुद्ध दिशेला जात सुकेळी खिंडीत उभ्या असलेल्या ट्रकला शुक्रवारी (दि. 29) पहाटे जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरमधील क्लिनर मृत्यू पावला.
मुंबई -गोवा महामार्गावरून भरधाव वेगाने चालेल्या डंपर (एमएच-46,बीबी-8595) चालकाने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुकेळी खिंडीत विरुद्ध दिशेला जात समोर उभ्या असलेल्या ट्रक (एमएच-05,ड-के 9409) ला जोरदार धडक दिली. या अपघातात डंपरमधील क्लिनर लालूप्रसाद शिवलाल महतो (वय 21, रा. झारखंड) हा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावला. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, सहाय्यक फौजदार गोविंद कदम पुढील तपास करीत आहेत.