माणगाव : प्रतिनिधी
मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने स्पर्धा परीक्षा वाचनालय सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शिवसह्याद्री प्रतिष्ठानचे मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत जोरकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला रणपिसे क्लासेस्च्या विद्यार्थ्यांची गणिताची स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर वाचनालयाचे उद्घाटन झाले. मंडळाचे सचिव संतोष रणपिसे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. अॅड. परेश जाधव यांनी स्पर्धा परीक्षांचे महत्व सांगितले. शिरसाट सजाचे तलाठी मारुती चाटे यांचेही समयोचीत भाषण झाले. शिवसह्याद्री प्रतिष्ठानने सॅनिटायर व मास्कची भेट दिली. शिरसाड ग्रामपंचायतीने स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके प्रदान केली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाचे व शाळा समितीचे सर्व पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी विशेष प्रयत्न केले.