Breaking News

मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत

जोफ्रा आर्चरचा टीम इंडियाला इशारा

चेन्नई ः वृत्तसंस्था
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचे काऊंटडाऊन आता सुरू झाले आहे. या मालिकेमधील पहिला सामना 5 फेब्रुवारीपासून चेन्नईत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा फास्ट बॉलर जोफ्रा आर्चर याने यंदा चांगले पिच असेल. या पिचचा इंग्लंडच्या बॉलर्सना फायदा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर भारतीय टीम स्पिन बॉलिंगला मदत करणार्‍या पिचवर आम्हाला हरवू शकत नाही. मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत, असा इशारा आर्चरने दिला आहे.  
भारतीय पिचवर टेस्ट मॅच जिंकण्याचा एक नेहमीचा फॉर्म्युला आहे. या सीरिजमध्येही त्याच आधारावर टीम इंडिया विजयी होईल, असा अनेकांचा अंदाज आहे. इंग्लंडच्या टीमलाही याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनीही याची तयारी सुरू केली आहे. चेन्नईचे पिच हे नेहमी बॅट्समन आणि स्पिन बॉलर्सना मदत करते असा इतिहास आहे. भारतीय टीममध्ये चांगले स्पिनर्स आहेत. या स्पिनर्सच्या जोरावर भारताला पहिल्या टेस्टमध्ये जिंकण्याची अधिक संधी असेल, असा सर्वांचा अंदाज आहे.
जोफ्रा आर्चरने ‘डेली मेल’ वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला आहे. त्यामध्ये आर्चर म्हणतो की, मी भारतामध्ये भरपूर क्रिकेट खेळलो आहे, पण मला इथे फर्स्ट क्लास क्रिकेटचा कोणताही अनुभव नाही. मला लवकरच भारतीय पिचवर रेड बॉलने बॉलिंग करताना येणारी आव्हाने माहिती होतील.
टेस्ट क्रिकेटमध्ये खेळाडूची इच्छा असेल तर तो संपूर्ण सत्र शांत खेळू शकतो. तसेच पिचची मदत मिळत नसेल तरी तुम्ही काही करू शकत नाही. आम्हाला चेन्नईमध्ये चांगल्या पिचची अपेक्षा आहे. आमच्या फास्ट बॉलर्सना त्याचा फायदा मिळेल. आमच्याकडेही चांगले स्पिनर्स आहेत. त्यामुळे पिचने स्पिनर्सना मदत केली तर या मालिकेत एकतर्फी लढती होणार नाहीत, असा इशारा आर्चरने दिला आहे.
2019च्या वर्ल्डकप फायनलमध्ये जोफ्रा आर्चरने सुपर ओव्हर टाकली होती. आर्चरच्या ओव्हरनंतरच इंग्लंडने विजेतेपद जिंकले होते. आर्चरला आजवर 11 टेस्टचा अनुभव असून, तो आशिया खंडात पहिल्यांदाच टेस्ट मॅच खेळणार आहे.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply