Breaking News

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कोकण दौर्‍यावर

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुढील महिन्यात कोकण दौर्‍यावर जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात बांधलेल्या लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या दौर्‍याबाबत अनिश्चितता होती, मात्र आता अमित शाह यांचा दौरा नक्की झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शाह यांचा कोकण दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 6 फेब्रुवारी रोजी अमित शाह कोकण दौर्‍यावर जाणार आहेत. सिंधुदुर्गातील लाइफटाइम वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हेही हजेरी लावणार असल्याचे समजते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply