Breaking News

ठाकरे कुटुंबीयांच्या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करा

  • भाजप नेते किरीट सोमय्या यांची मागणी
  • रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

अलिबाग : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबीयांनी मुरूड तालुक्यातील कोर्लई येथे जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकार्‍यांनी द्यावेत, या मागणीसाठी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बुधवारी (दि. 10) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
या वेळी सोमय्या यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्यांना अडवले. त्यामुळे सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. कोर्लईत जमीन घोटाळा झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्य केले आहे. मग यात दोषी कोण याची चौकशी व्हायला हवी. 12 कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली मालमत्ता दोन कोटींमध्ये कशी खरेदी करण्यात आली हे या चौकशीतून समोर यायला हवे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.
या आंदोलनात भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, सतीश लेले, दर्शन प्रभू, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, रवी मुंढे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply