चिरनेर : रामप्रहर वृत्त
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या कृषी खात्याकडूनही सोशल डिस्टन्सिंग पाळत, अतिदक्षता व खबरदारी घेऊनच, खरिप हंगामाची पेरणी करण्याकरिता उरण कृषी कार्यालयाच्या सहाय्यक अधिकारी संगिता पाटील यांच्या पुढाकाराने वेश्वी व दिघोडे या गावातील शेतकर्यांना भात बियाणांचे वाटप
करण्यात आले.
यात वेश्वी गावातील शेतकर्यांसाठी दिड टन भात बियाणे तर दिघोडे गावातील शेतकर्यांसाठी एक टन भात बियाणे असे एकूण अडीच टन भात बियाणांचे वाटप या दोन गावातील शेतकर्यांसाठी करण्यात आले. या वेळी शेतकर्यांनी कोरोनाचे नियम पाळत रांगेत एक मीटरचे परस्पर अंतर ठेवून बियाणांचा स्विकार केला. दरम्यान शेतकर्यांच्या पसंतीचे भात बियाणे म्हणजे महाबिजचा जया, आंध्रचा जया, कोमल, तृप्ती, वाय.एफ.आर. श्रीराम, गंगा-कावेरी, अवणी यासारखे अधिक उत्पन्न देणारे बियाणे शेतकर्यांना मिळाल्यामुळे येथील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पहावयास मिळाले. पनवेल येथील भगवान कृषी सेवा केंद्राकडून या भात बियाणांची कृषी खात्याने मागणी करून हि बियाणे शेतकर्यांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे उत्तम काम करण्यात आले. यासाठी कृषी अधिकारी क्रांती चौधरी मंडळ कृषी अधिकारी एन.वाय.घरत, द्भषी पर्यवेक्षक एन. आर.गरड, सरपंच नरेंद्र मुंबईकर, सरपंच सोनिया घरत, उपसरपंच कैलास म्हात्रे, कृषी मित्र मधुकर मुंबईकर आदींनी परिश्रम घेतले.