पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुुंडे यांची नियुक्ती झाली आहे.
या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे यांनी शामनाथ पुुंडे यांचे अभिनंदन केले.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper