पनवेल : शेलघर ग्रामस्थ मंडळ व महेश स्पोर्ट्स यांच्या वतीने जावळे येथील मैदानात आयोजित सरपंच चषक 2021 स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे कौतुक केले. या वेळी आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्य विजय घरत तसेच अजय भगत, प्रल्हाद भगत, सुहास भगत, बाळकृष्ण भगत, संतोष भगत, ज्ञानेश्वर म्हात्रे सोबत होते.
पनवेल : भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा चषक 2021 क्रिकेट स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला. नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, मुकीद काझी, नगरसेविका दर्शना भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, आयोजक केदार भगत आदी व्यासपीठावर उपस्थित होते.