Breaking News

विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेचा थरार

मुंबई : प्रतिनिधी

विश्व मल्लखांब फेडरेशनच्या विद्यमाने आणि भारतीय मल्लखांब महासंघ तसेच महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटना यांच्या वतीने पहिल्या विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. शनिवारी

(दि. 16) सकाळी शिवाजी पार्क येथे मल्लखांब स्पर्धेचा शुभारंभ क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आमदार भाई गिरकर, अभिनेते नसरुद्दीन शहा, विश्व मल्लखांब फेडरेशनचे संचालक व प्रमुख कार्यवाह उदय देशपांडे आदी उपस्थित होते. विश्व अजिंक्यपद मल्लखांब स्पर्धेमध्ये जगभरातील 15 देशांमधून 150 खेळाडू सहभागी झाले आहेत. मल्लखांब या प्राचीन पारंपरिक भारतीय व्यायाम प्रकाराच्या प्रसारासाठी विशेष प्रयत्न करणार्‍या 10 ज्येष्ठ कर्तृत्ववान मल्लखांब धुरिणांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ना. तावडे म्हणाले, मल्लखांब हा मातीतील खेळ आहे. मल्लखांब या खेळामुळे शारीरिक लवचिकता, शारीरिक संतुलन व मानसिक संतुलनही राखले जाते. त्यामुळे मल्लखांबमध्ये मानसिक संतुलनाला प्राधान्य देण्यात येते. आजच्या युवा पिढीला या मानसिक संतुलनाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे मातीतल्या भारतीय खेळातून ही संतुलन साधण्याची कला देणारा हा खेळ नक्कीच महत्त्वाचा ठरतो. आजच्या या युवा पिढीने आपला मैदानावरील खेळ मल्लखांबसाठी दिल्यास त्याचा त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. या वेळी उपस्थित खेळाडूंनी मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक करून दाखविले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply