Breaking News

भाजपतर्फे शिवगान स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने राज्यस्तरीय द्विस्तरीय शिवगान स्पर्धा 2021चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा खुली असून, यात महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास सहभाग घेता येणार आहे. भाजप सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष शैलेश गोजमगुंडे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा होणार असून, यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तिगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग आदी प्रकारच्या गीतांचा असणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य आहे. प्राथमिक फेरी येत्या मंगळवारी (दि. 9) पनवेल येथे होणार असून अंतिम फेरी 19 फेब्रुवारीला सातारा येथील अजिंक्यतारा गड या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जिल्हास्तरावर व अंतिम फेरी राज्यस्तरावर होईल.  या स्पर्धेत उत्तर रायगड जिल्ह्यातून अंतिम फेरीकरिता स्पर्धकांची निवड होणार असून, त्यासाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भरघोस रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्तर रायगड जिल्हा प्राथमिक फेरीत वैयक्तिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांकास सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये, तृतीय क्रमांकास तीन हजार रुपये, तसेच सांघिक गीत गायन स्पर्धेतील विजेत्या संघास 11 हजार रुपये, द्वितीय सात हजार 500 रुपये, तृतीय पाच हजार 100 रुपये आणि प्रत्येक विजेत्यास स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेत उत्तर रायगडातील नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी केले आहे. स्पर्धेत सहभाग तसेच अधिक माहितीकरिता पनवेल-गणेश जगताप (9870116964), संजीव कुलकर्णी (9987015683), कामोठे-(भागराज चौधरी) 7977787670, सुशील शर्मा (9920707610), पनवेल ग्रामीण-मंगेश वाकडीकर (9870229545), उरण-मनोहर जामकर (9757165263), परेश तेरडे (9833987080), निखिल म्हात्रे (9870703901), कर्जत-बल्लाळ जोशी (9881540917), वेदांती गोडबोले (9371481838), चैतन्य भागवत (8329143824), खारघर-उमेश चौधरी (9324824205), मोतीराम कडू (9322502388), खोपोली-उज्ज्वला दिघे (7972091455), निशा दळवी (9823415315), खालापूर-शशिकांत मोरे (9404808686), प्रवीण जांभळे (9011796108), कळंबोली-दिलीप बिष्ट (7304718880), संजय दोडके (9987008442), वैशाली रेडकर (9969693289) यांच्याशी संपर्क साधावा. 

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply