Breaking News

मोठा खांद्यात विद्युत खांबांचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेवकांच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येत आहेत. त्या अंतर्गत प्रभाग समिती ‘क’ सभापती हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीतून मोठा खांदा येथील स्मशानभूमीत विजेचे खांब उभारण्यात आले आहेत. त्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 2) करण्यात आले. या कार्यक्रमास माजी नगरसेवक गणपत म्हात्रे, तसेच जयंत भगत, मेघनाथ म्हात्रे, शैलेश म्हात्रे, अविनाथ पाटील, प्रथमेश म्हात्रे, भावेश गायकर, गणेश म्हात्रे, उमेश डोंगरे, दीपक जैसवाल, हेमंत म्हात्रे, प्रसाद म्हहात्रे, स्वप्नील म्हात्रे, राजेश डोंगरे, कमल म्हात्रे, हर्षल म्हात्रे, प्रज्ञा म्हात्रे, सारिका म्हात्रे, करिष्मा म्हात्रे, सागर म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे यांच्यासह पवनपुत्र महिला मंडळच्या सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या कामासह प्रभागात करण्यात येणार्‍या कामाबद्दल माहिती दिली.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply