Breaking News

साथ आएं, देश बनाएं!

भाजप सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

खारघर : रामप्रहर वृत्त

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या पनवेलमधील सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शनिवारी (दि. 6) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते खारघर येथे करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी, येणारी विधानसभा निवडणूक लक्षात घेत मन लावून काम करा, असे आवाहन केले.

खारघर येथील भाजपच्या मध्यावर्ती कार्यालयात झालेल्या सदस्य नोंदणी अभियान शुभारंभास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लीना गरड, प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अभिमन्यू पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जास्तीत जास्त नागरिकांना सदस्य नोंदणी अभियानात सहभागी करून घ्या, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply