Breaking News

विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो -सुनील गावसकर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

2019 साली इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना भारतीय फलंदाजीच्या तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावरच्या फलंदाजीचे कोडे सुटलेले नाही. काही खेळाडू सध्या या शर्यतीत आहेत. अशा वेळी विराट कोहली विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, असे सूचक विधान प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते, ज्याला माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. इंग्लंडमध्ये विश्वचषकादरम्यानचे वातावरण हे वेगळे असेल. गोलंदाजांना याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रतिस्पर्धी संघाने 300पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य दिले आणि भारताचे आघाडीचे फलंदाज लवकर माघारी परतल्यास विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो, असे मत सुनील गावसकरांनी मांडले आहे.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply