अडीच वर्षांच्या चिमुरड्याकडून किल्ले रायगड सर

नेरळच्या वेदांत साळुंखेची कमाल

कर्जत : बातमीदार
नेरळ येथील अडीच वर्षीय वेदांत विशाल साळुंखे या बालकाने ऐतिहासिक किल्ले रायगड अवघ्या पावणे दोन तासांत सर करण्याचा पराक्रम केला आहे. 2900 फुटांवरील आणि 1435 पायर्‍या असलेला हा किल्ला कोणत्याही आधाराविना चढल्याबद्दल वेदांतचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नेरळमधील वेदांत हा वडिलांसोबत स्थानिक परिसरातील टेकड्या, डोंगर चढून जात असतो. कर्जत तालुक्यातील लहान गड-किल्लेही तो लीलया पार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून निवडलेला आणि अवघड समजला जाणारा किल्ले रायगड चढून सर करण्याचा निर्णय वेदांतने घेतला. त्यानुसार 7 ऑगस्ट रोजी वेदांत हा आई- वडील आणि काका-काकी यांच्यासह नेरळ येथून रवाना झाला. सर्वांनी 11 वाजून 10 मिनिटांनी किल्ल्याच्या पायर्‍या चढण्यास सुरुवात केली. पायर्‍यांच्या बाजूने वाहणार्‍या पाण्यात खेळत, तर कधी उंच पायरीवर हात टेकत पायर्‍या चढणारा वेदांत न थकता पावणे दोन तासांत किल्ल्यावर पोहचला.
किल्ल्यावर पोहचल्यावर वेदांतने बहीण लावण्या आणि अनुष्का या दोघींसह प्रथम होळीच्या माळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्या वेळी तेथे उपस्थित सर्वांनी वेदांतच्या या कामगिरीचे कौतुक केले. तेथून वेदांतने राजदरबारातील मेघडंबरी येथील शिवरायांच्या सिंहासनधिष्टीत पुतळ्याला वंदन केले. मग तो महाराजांची समाधीस्थळी गेला व नतमस्तक झाला. शेवटी किल्ल्याचा परिसर फिरून वेदांत परतला.
रायगड किल्ल्यावर दररोज शेकडो पर्यटक पायर्‍या चढून जात असतात.त्यात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा समावेश असतो, परंतु अडीच वर्षांच्या मुलाने सर्व पायर्‍या चढून गडावर पोहचणे हे पहिलेच उदाहरण असल्याचे स्थानिक सांगत आहेत.

Check Also

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami

Połączenie 30 darmowych spinów Mostbet z innymi bonusami W dzisiejszym artykule skupimy się na tym, …

Leave a Reply