Breaking News

अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात फायर सेफ्टी प्रशिक्षण

अलिबाग : जिमाका

येथील जिल्हा रुग्णालय येथे रुग्णांच्या तसेच रुग्णालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालय आणि अग्निशामक प्राधिकरणाच्या  सहकार्याने सोमवारी (दि.1) अधिकारी, कर्मचार्‍यांचे फायर सेफ्टी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक घेण्यात आले. भंडारा जिल्ह्यासारखे प्रकरण या जिल्हा रुग्णालयात घडू नये, यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगितले. या वेळी अग्निशामक प्राधिकरण तज्ज्ञांनी आगीचे प्रकार सांगून आग कशा पध्दतीने विझवावी, याची प्रात्यक्षिके  करुन दाखविली. रुग्ण व रुग्णालयाच्या दृष्टीने फायर सेफ्टीबाबतचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच अप्रत्यक्षरित्या आग लागल्यानंतर बचाव कसा करावा, याचे प्रात्यक्षिक उपस्थित अधिकारी, कर्मचार्‍यांकडून करून घेण्यात आले. रुग्णालयाबरोबरच रुग्ण व त्यांना भेटायला येणार्‍या नातेवाईकांचीही सुरक्षा कशी करावी, याचेही प्रात्यक्षिक अग्निशामक दलातील तज्ज्ञांच्या देखरेखीखाली करुन  घेण्यात आले. या प्रशिक्षण व प्रात्यक्षिकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, प्रशासकीय अधिकारी पी. डी. धामोडा, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल फुटाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, अधिसेविका जयश्री मोरे, कार्यालयीन अधीक्षक सुरेश शिंपी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएचएम) डॉ. चेतना पाटील तसेच रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply