Breaking News

टी-10 लीगमध्ये ख्रिस गेलचे ‘तुफान’

युवराज सिंगच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

अबूधाबी ः वृत्तसंस्था
 अबूधाबी टी-10 लीगमध्ये युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने मराठा अरेबियन्स संघाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अबूधाबी टीमचे प्रतिनिधित्व करताना गेलने 22 चेंडूंत नाबाद 84 धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर अबूधाबी टीमने 5.3 षटकांत 100 धावांचे लक्ष्य पार केले. मराठा अरेबियन्सने प्रथम फलंदाजी करताना 4 विकेट्सच्या मोबदल्यात 10 षटकांत 97 धावा केल्या होत्या.
टी-10 लीगच्या यंदाच्या मोसमातील पहिल्या चार सामन्यांत ख्रिस गेलला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याने अनुक्रमे 4, 5 , 9 आणि 2 धावा केल्या होत्या, पण बुधवारी झालेल्या सामन्यात 41 वर्षीय गेल जुन्या अंदाजात दिसला. त्याने 6 चौकार आणि 9 षटकार खेचले. गेलने 78 धावा फक्त चौकार व षटकारांनी केल्या. ख्रिस गेलने टी-10 लीगमध्ये सर्वांत जलद अर्धशतकाचा विक्रमही नावावर केला. त्याने 12 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.
यासह त्याने युवराज सिंगच्या विक्रमाशीही बरोबरी केली. युवीने 2007च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूंत 50 धावा केल्या होत्या. ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये दबदबा राखला आहे. त्याने 411 टी-20 सामन्यांत 146.72च्या स्ट्राईक रेटने 13,584 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 22 शतके आणि 85 अर्धशतके आहेत. टी-20मध्ये सर्वाधिक 1000 षटकारांचा विक्रमही गेलच्या नावावर आहे.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply