Breaking News

भारताचे तिहेरी फिरकी गोलंदाजीचे सूत्र

अश्विन, कुलदीप निश्चित; वॉशिंग्टन, अक्षरपैकी एकाला संधी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
चेपॉक म्हणजेच एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर शुक्रवार (दि. 5)पासून सुरू होणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने तिहेरी फिरकी गोलंदाजीच्या मार्‍याचे सूत्र निश्चित केले आहे. अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि ‘चायनामन’ कुलदीप यादव हे दोघे पहिल्या पसंतीचे फिरकी गोलंदाज असतील, तर तिसर्‍या स्थानासाठी ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदर आणि डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.
वेगवान गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियात संस्मरणीय यश मिळाल्यानंतरही आता मायदेशातील कसोटी मालिकेच्या आव्हानाकडे पाहताना भारताने पुन्हा फिरकी गोलंदाजीचा पारंपरिक मार्ग पक्का केला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीसाठी चेपॉकची खेळपट्टी ही परंपरेप्रमाणेच असेल. पहिले तीन दिवस फलंदाजांना पोषक असेल, तसेच चेंडू उसळू शकेल, परंतु उर्वरित शेवटच्या दोन दिवसांत ती फिरकीला साथ देईल. या पार्श्वभूमीवर अश्विन आणि कुलदीपचे स्थान निश्चित मानले जात आहे.
तिसर्‍या स्थानासाठीही ऑस्ट्रेलियातील अखेरच्या कसोटी सामन्यात अष्टपैलू चमक दाखवणार्‍या वॉशिंग्टनचा अक्षरपेक्षा प्राधान्यानाने विचार केला जाऊ शकतो. वॉशिंग्टनमुळे भारताची फलंदाजी उत्तरार्धातसुद्धा बळकट होईल, असे संघ व्यवस्थापनाच्या सूत्रांनी सांगितले. श्रीलंका दौर्‍यावर इंग्लंडच्या फलंदाजांवर डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ ईम्ब्युलडेनियाने अंकुश ठेवला होता. त्यामुळे डावखुर्‍या फिरकी गोलंदाजीचा मुद्दा अक्षरसाठी अनुकूल ठरू शकतो.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply