Breaking News

खारघरच्या निरसुख पॅलेसवर भाजपचा हल्लाबोल

बार बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

खारघर ः रामप्रहर वृत्त

दारूमुक्त शहर अशी ओळख असलेल्या खारघरमधील नवीन परवानाधारक निरसुख पॅलेस बार व रेस्टॉरंटवर भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 20) धरणे आंदोलन केले. खारघरमधील ग्रामस्थ, राजकीय व सामाजिक संघटना यांच्या एकत्रित चळवळीमुळे खारघरची ओळख दारूविक्री बंद खारघर अशी आहे. शैक्षणिक नगरी, पांडवकडा व खारघर हिलसारखे निसर्गरम्य परिसर व नो लिकर झोन अशा ओळखीमुळे खारघरमध्ये राहणे अनेक नागरिक पसंत करतात. मागील 20 वर्षांपासून नागरिकांच्या एकत्रित लढ्यामुळे खारघरमध्ये एकही वाईन शॉप किंवा बिअर शॉपी उघडले गेले नाही. काही वर्षांपूर्वी दोन-तीन व्यावसायिकांनी तसा प्रयत्न केला होता, परंतु संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व राजकीय पक्षाने तो हाणून पाडला. दोन आठवड्यांपूर्वी अशाच एका व्यावसायिकाने कोपरा गावातील सेक्टर 10मध्ये निरसुख बार व रेस्टॉरंट सुरू केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रेस्टॉरंटच्या मालकाला मद्यविक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे खारघर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची लाट पसरली होती. अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने रविवारी धरणे आंदोलन केले. खारघर पोलिस स्थानकात रितसर पत्र देण्यात आले होते. तत्पूर्वी आमदार प्रशांत ठाकूर, शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे व उपाध्यक्ष बिना गोगरी यांनी याविरोधात संबंधित खात्यांशी पत्रव्यवहार केला होता. रविवारी सकाळी 11 वाजता भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हॉटेल हायवे ब्रेक ते निरसुख बारपर्यंत चालत आंदोलन केले. सर्व कार्यकर्त्यांनी बारसमोर बसून धरणे केले. हॉटेल मालकाच्याविरोधात घोषणाबाजी करून हॉटेलवरील निरसुख बार व रेस्टॉरंट नावाचे फलक काढण्यात आले. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी या आंदोलनात आम्ही जनतेसोबत होतो आणि शेवटपर्यंत राहू असे सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात या बारला परवाना मिळाल्याचेसुद्धा त्यांनी स्पष्ट केले. बारचा परवाना रद्द करण्याचा प्रयत्न शासन दरबारी करण्याचे प्रयत्न केले जातील असेही ते पुढे म्हणाले. निरसुख बार व रेस्टॉरंटच्या मालकाने पनवेल महानगरपालिका व स्थानिक पोलीस स्थानक यांना विश्वासात न घेता राज्य उत्पादन शुल्क खात्याकडून महाविकास आघाडी सरकारच्या काळात विशेष परवानगी घेऊन परवाना उपलब्ध झाल्याचे समोर आले आहे. या वेळी माजी सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, जिल्हा सोशल मीडिया संयोजिका मोना अडवाणी, सरचिटणीस दीपक शिंदे,कीर्ती नवघरे, बिना गोगरी, गुरुनाथ गायकर, महिला सरचिटणीस साधना पवार, उपाध्यक्षा प्रतीक्षा कदम, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय, अंकिता वारंग, अश्विनी भुवड, सीमा खडसे, सुशीला शर्मा, मीरा घुगे, वैशाली प्रजापती, ज्योत्स्ना पामकर, संतोष गायकर, काश्मीरा बेर्डे, निर्मला यादव, अश्विनी कदम, मीनाक्षी अंथवार, जल्पा शास्त्री, सुरेखा कदम, सुनिता देवाडिया, अजय माळी, राजेंद्र मांजरेकर, विनोद ठाकूर, केतन नवघरे, अनिल साबणे, विलास निकम, नवनीत मारू, नितीन पामकर, संतोष कदम, विलास सावंत, संदीप कासार, जयकुमार पांडे, शैलेंद्र त्रिपाठी, भूषण थोरात, सुखदेव खरात, बाळासाहेब काळे, तुकाराम घोडके,दिलीप पांचाळ, दिलीप नारळावकर, जे. एन. झा आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply