Breaking News

प्रलंबित समस्या मार्गी लावणार

आमदार महेश बालदी यांचे कोयना प्रकल्पग्रस्तांना आश्वासन

मोहोपाडा : प्रतिनिधी

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी धोरणात्मक विषयावर वरिष्ठ पातळीवर व जिल्हाधिकारी यांच्याकड़े बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांनी दिले.

कोयना प्रकल्पग्रस्त चौक वावंढळ गावातील शिष्टमंडळाने कॅप्टन विठ्ठलराव कदम यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेश बालदी यांची भेट घेतली. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्या व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आमदार बालदी यांना निवेदन सादर करण्यात आले. आमदार निधीतुन विकास कामे करून देण्याचे आश्वासन या वेळी आमदार बालदी यांनी शिष्टमंडळाला दिले.

कोयना जलविद्युत प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या कोयना प्रकल्पग्रस्त यांचे गेली 62 वर्षे अनेक प्रश्न प्रलंबित असून अद्याप ही अनेक खातेदारांना पर्यायी जमीन दिलेली नाही. महसूल दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत दिलेली नाही. सातारा जिल्ह्यातील शिल्लक व संपादन न झालेल्या जमिनीचा मोबदला न देता जमीन परस्पर वर्ग करण्यात आली आहे.

यासाठी जमिनीचा मोबदला मोबदला मिळणे, दिलेल्या गावठानाची नोंद करून तिचे मोजमाप व प्लॉट निर्मिती करून मूळ खातेदारांना वितरित करून त्यावरील अतिक्रमण दूर करणे, विस्तारित गावठाणसाठी गुरुचरण जागा मिळावी, दाखले उपलब्ध असणारे यांना शाशकीय नोकरी देणे, वय मर्यादा झालेल्या दाखलेदार यांना भरपाई देऊन व्यवसाय करण्यासाठी एक रकमी पैसे देणे, गावातील नागरी सुविधा नळ पाणीपुरवठा, गटार, विद्युत नूतणीकरण, मैदान, रस्ते बांधणी आदी समस्यांवर या वेळी सखोल चर्चा झाली.

धोरणात्मक विषयावर वरिष्ठ पातळीवर व जिल्हाधिकारी यांच्याकडे बैठक आयोजित करून समस्या मार्गी लाऊ, असे आश्वासन आमदार बालदी यांनी देऊन आमदार निधीतुन विकास कामे करून देण्याचे त्यांनी कबूल केले.

या वेळी गंगाराम चव्हाण, बळीराम कदम, गंगाराम कदम(महिपत), परशुराम कदम, विलास कदम, दत्ताराम कदम, राजेंद्र कदम, नीलेश कदम, गौरव कदम, अप्पा कदम आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply