Breaking News

पेणमध्ये महायुतीला वाढता प्रतिसाद

जनता रविशेठ पाटील यांच्या पाठीशी -गटनेते अनिरुद्ध पाटील

पेण : प्रतिनिधी

विधानसभेच्या पेण मतदारसंघात भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीला मिळणारा मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता येथे रविशेठ पाटीलच बाजी मारतील, असा विश्वास नगर परिषदेतील गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केला. विकासकामांचा ध्यास घेतलेले रविशेठ पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी देऊन आपले मनसुबे स्पष्ट केले आहेत. या मतदारसंघातील जनतेला गेली अनेक वर्षे शेकापने झुलवत ठेवण्याचे काम केले असून, जनता आता ते समजून चुकली आहे. यामुळेच या मतदारसंघात रविशेठ पाटील यांचे पारडे जड झाले आहे. सगळ्यांना सोबत घेऊन व कार्यकर्त्यांची मजबूत फळी उभी करून रविशेठ पाटील यांनी या वेळी पेणचा गड सर करायचाच असा चंग बांधला आहे. महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ आतापर्यंत आम्ही या विधानसभा मतदारसंघातील अनेक वाड्या, गावे पिंजून काढून थेट मतदारांशी संवाद साधला आहे. त्यात मतदारसंघातील सर्वधर्मिय व अबालवृद्धांनी रविशेठ पाटील यांना विधानसभेत पाठवायचेच, असा संकल्प केला असल्याचे दिसून आाले. त्यानुसार रविशेठ पाटील प्रचंड बहुमताने निवडून येतील, असा विश्वास गटनेते अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply