Breaking News

पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्‍यांचे पनवेल महापालिकेत समावेशन

पनवेल ः प्रतिनिधी
पूर्वाश्रमीच्या ग्रामपंचायतींमधील 32 कर्मचार्‍यांचे महानगरपालिकेच्या आस्थापनामध्ये समावेशन करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 3)
घेण्यात आला. याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रयत्न व पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे 32 कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शुक्रवारी (दि. 4)
या कर्मचार्‍यांनी आयुक्त गणेश देशमुख यांना पुष्पगुच्छ देऊन प्रशासनाचे आभार मानले.
1 ऑक्टोबर 2016मध्ये पनवेल महापालिका स्थापन झाल्यानंतर त्यात 29 गावांचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर या 29 गावांमधील पूर्वाश्रमीच्या 23 ग्रामपंचायतींमधील 320 पदांपैकी 288 पदांचे याआधीच महापालिका आस्थापनेमध्ये समावेशन करण्यात आले होते. यामधील काही तांत्रिक कारणांनी राहिलेल्या उर्वरित 32 कर्मचार्‍यांचे राज्य शासन निर्णयाप्रमाणे समावेशन करण्यात आले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विठ्ठल डाके व सहाय्य्क आयुक्त सुवर्णा दखणे यांनी या 32 कर्मचार्‍यांचे समावेशन व्हावे यासाठी संपर्क ठेवला. सातत्याने नगरविकास विभागाचा पाठपुरावा केला होता. अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून राज्य शासनाच्यावतीने 32 कर्मचार्‍यांना लिपीक-टंकलेखक, सफाई कामगार, शिपाई, बहुद्देशीय कामगार या पदांवर समावेशन करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

Check Also

पनवेलच्या कल्पतरू सोसायटीत सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन पनवेल : रामप्रहर वृत्त शाश्वत ऊर्जा पद्धतीसाठी …

Leave a Reply