Breaking News

प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी

पनवेल : वार्ताहर

माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पुन्हा एकदा प्रभाग 18 मध्ये कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे.

नगरसेवक विक्रांत पाटील हे आपल्या प्रभागात नेहमीच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. प्रभागातील विकास कामांबरोबर नागरिकांच्या स्वास्थ्याची काळजीही तत्परतेने घेत असतात. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रभागातील सोसायट, बिल्डिंग तथा बैठी घरे येथे प्रत्येक घराबाहेरील परिसरात कोरोना जंतुनाशक फवारणी करून घेतली आहे.

याआधीही स्वतः मशीन खरेदी करून त्या माध्यमातून पाच वेळा आणि तीन वेळा महापालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारे कोरोना जंतुनाशक फवारणी विक्रांत पाटील यांनी आपल्या प्रभागात करून घेतली आहे.

प्रभाग 18 मधील सोसायटी, बिल्डिंगमध्ये जर काही कारणाने पुन्हा फवारणी करायची असल्यास त्यांनी कृपया माझ्या जनसेवा कार्यालयाशी संपर्क साधावा अथवा 9167042666 या हेल्पलाइन नंबरवर संपर्क करावा, तसेच नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी व अत्यंत गरज असेल तरंच घराबाहेर पडावे, असे आवाहन विक्रांत पाटील यांनी केले आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply