
पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्ष पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या रविवारी जाहीर करण्यात आल्या. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी नियुक्ती झालेल्या पदाधिकार्यांना नियुक्तिपत्र प्रदान केले. पनवेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात सिडको अध्यक्ष तथा रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका मंडल अंतर्गत सोशल मीडिया सेलच्या नियुक्त्या रविवारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये भाजपा सोशल मीडिया पनवेल तालुका संयोजकपदी विनय पाटील, भाजप सोशल मीडिया पनवेल तालुका अध्यक्ष विशाल शिंदे, मोना अडवाणी, गुरुनाथ म्हात्रे, प्रसाद हनुमंते, संदीप देशमुख, मंगल घोलप, गणेश म्हात्रे, रेणू अगरवाल, आदित्य मावले, त्रिजिता नेगी, अक्षय सिंग, कांचन कुमार यांची सोशल मीडियाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. या वेळी जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, नगरसेवक नितीन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.