Breaking News

पुलवामात घातपाताचा कट उधळला; बस स्टॅण्डजवळ सापडली स्फोटके; जवानांची सतर्कता

श्रीनगर : वृत्तसंस्था

पुलवामामध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला रविवारी (दि. 14) दोन वर्षे झाली. या हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. पुलवामा हल्ल्याच्या स्मृतीदिनी पुन्हा दहशतवाद्यांकडून घातपाताचा कट रचण्यात आला होता, मात्र जवानांच्या सतर्कतेने हा कट उधळला गेला. दहशतवाद्यांनी जम्मू बसस्टॅण्डजवळ दडवून ठेवलेली सात किलो स्फोटके जवानांनी हस्तगत केली. यामुळे मोठा अनर्थ टळला. या संदर्भात माहिती देताना जम्मू झोनचे आयजीपी मुकेश सिंह यांनी सांगितले की, आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हाय अलर्टवर होतो. आमच्याकडे आधीपासूनच इनपुट होते की, पुलवामा हल्ल्याच्या दिवशी दहशतवादी मोठा हल्ला करण्याचा विचार करीत आहेत. तपासादरम्यान आम्ही चंदिगडमध्ये शिकत असलेल्या नर्सिंग विद्यार्थिनी सोहेलला अटक केली आहे. तो दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील आहे. त्याला पाकिस्तानच्या अल-बद्र -तंजीमकडून आयईडी प्लांट करण्याचा संदेश मिळाला होता. चंडीगड येथील काझी वसीम नावाच्या व्यक्तीलाही या प्रकरणाची माहिती होती, तोही पकडला गेला आहे. यासह अबिद नबी नावाच्या व्यक्तीलाही पकडण्यात आले आहे.

शहीद जवानांना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

चेन्नई : वृत्तसंस्था

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला रविवारी (दि. 14) दोन वर्षे झाली. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता, ज्यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या शहीद जवानांना चेन्नई येथे श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमात पंतप्रधानांनी 118 अर्जुन रणगाडे सैन्याला सोपवले. या वेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, कोणताही भारतीय हा दिवस विसरू शकत नाही. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पुलवामा हल्ला झाला होता. आम्ही त्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण करतो, जे या हल्ल्यात शहीद झाले होते. आम्हाला आपल्या जवानांचा अभिमान आहे. त्यांच्या शौर्याने अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील, अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी अभिवादन केले.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply