मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
मोखाडा : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे. जेएम फायनान्शियल फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून उभारण्यात आलेल्या या केंद्राचे उद्घाटन फाऊंडेशनच्या विश्वस्त तथा चेअरमन दिप्ती निलकंतन यांच्या हस्ते आणि ‘रयत’चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाले.
रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष दिवसेंदिवस विस्तारत असून संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जेएम फायनान्शियल फाउंडेशनच्या सीएसआर फंडातून मोखाडा महाविद्यालयात डिजिटल साक्षरता प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्राच्या उद्घाटन समारंभास रयत शिक्षण संस्थेचे व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, ऑडिटर शिवलिंग मेनकुदळे, रायगड विभागीय अधिकारी रोहिदास ठाकूर, मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील, जेएम फाउंडेशनच्या सीएसआर प्रमुख पूजा दवे, प्राचार्य डॉ. एल. डी. भोर, सुनील कराळे, देवांशी द्विवेदी, नवी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक दशरथ भगत यांच्यासह पदाधिकारी, रयतसेवक आणि शिक्षणप्रेमी उपस्थित होते. या वेळी जेएम फाऊंडेशनच्या पदाधिकार्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.