Breaking News

कोपरखैरणेतील उद्याने सुरू करा -भाजपच्या सुनीता हांडेपाटील यांची मागणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी

कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मधील सेक्टर 23 परिसरातील महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान जनतेसाठी सुरू करण्याची लेखी मागणी भाजपच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे. कोरोना सुरू झाल्यापासून कोपरखैराणे, महापालिका प्रभाग 42 मध्ये सेक्टर 23 परिसरात महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूरसाहेब उद्यान बंदच आहे. जवळपास नऊ महिन्याहून अधिक कालावधी लोटला तरी ही उद्याने बंद असल्याने स्थानिक जनतेची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्योन नवी मुंबई शहरातील जवळपास सर्वच उद्याने महापालिका प्रशासनाने उघडली आहेत. मात्र सेक्टर 23 परिसरात महापालिकेचे शांतीदूत महावीर उद्यान, श्री गुरू तेग बहाद्दूर साहेब उद्यान सुरू करण्यास महापालिका प्रशासनाकडून चालढकलच करण्यात आली आहे. हा  परिसर सिडको गृहनिर्माण वसाहतींचा व श्रमिकांच्या चाळीचा आहे. उद्याने बंद असल्याने नागरिकांची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी उद्याने लवकरात लवकर सुरू करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्याची मागणी भाजपच्या सुनिता हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.

Check Also

चित्रपटाच्या नवीन भागांचा ट्रेंड

बस्स एक पिक्चर सुपर डुपर हिट होऊ देत… त्याच्या वाढत्या उत्पन्नाच्या भराभर ब्रेकिंग न्यूज येऊ …

Leave a Reply