Breaking News

मतदानवाढीसाठी अनोखा फंडा; मतदान करा अन् मिळवा मोफत जेवण, औषधांवर सूट

नोएडा ः वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मतदान करावे यासाठी निवडणूक आयोग देशभर विविध कार्यक्रम राबवत आहे. निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पथनाट्ये, विविध कार्यक्रमांतून मतदानासंदर्भात जनजागृती केली जात आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आता व्यापारी संघटनाही पुढाकार घेत आहेत. दिल्लीजवळील नोएडामध्ये केमिस्ट असोसिएशनने मतदान करणार्‍यांना औषधांवर 10 टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे. बोटावरील शाई दाखवल्यानंतर 10 टक्के सूट देण्यात येणार आहे, तसेच मतदान करणार्‍यांना ’दादी की रसोई’कडून मोफत जेवण देण्यात येणार आहे.  मतदान करणार्‍यांना औषधांवर 10 टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अनूप खन्ना यांनी केली आहे. मतदान करणार्‍यांना ’दादी की रसोई’कडून मोफत जेवणही देण्यात येणार आहे. मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक खासगी रुग्णालयांनीही मतदारांसाठी नव्या योजना सुरू केल्या आहेत. मतदान केल्यानंतर मोफत तपासणी आणि उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तर काही रुग्णालयांनी रुग्ण तपासणी आणि उपचार खर्चात 10 ते 15 टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. नोएडामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला मतदान होणार आहे.

ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने याआधी शुक्रवारी (5 एप्रिल) मतदान करणार्‍यांना पेट्रोल-डिझेलवर सूट देण्याची घोषणा केली होती. मतदानासंदर्भात जनजागृती करण्यासाठी प्रमोट व्होटिंग मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनने दिली  आहे. मतदान केल्यानंतर संबंधितांना प्रतिलिटर 50 पैसे सूट दिली जाणार आहे. प्रमोट मोहिमेत सहभागी झालेल्या पेट्रोलपंपांवर सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. जगातील सर्वांत मोठी लोकशाही हे मानाचे बिरूद मिरवणार्‍या आपल्या देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. त्यानुसार या कालावधीत लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. एकूण सात टप्प्यांत ही निवडणूक प्रक्रिया पार पडेल, असे केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी जाहीर केले होते.

17व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचे सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे.

-अरुणाचल प्रदेश चौकीवरील मतदान प्रक्रिया पूर्ण

लोकसभा निवडणुकीसाठी 11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होणार आहे, मात्र भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या अरुणाचल प्रदेशमधील चौकीवर शुक्रवारी (5 एप्रिल) मतदान घेण्यात आले. भारत-तिबेटची ही सीमा अरुणाचल प्रदेशमधून जाते. लोहितपूरमध्ये पोस्टल मतदानाच्या माध्यमातून भारत-तिबेट सीमा पोलिसांनी मतदान केले आहे. यामध्ये 80 पोलिसांचा समावेश होता. अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूकही आहे. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमधील मतदार दोन निवडणुकांसाठी मतदान करीत आहेत. त्यासोबतच भारत-तिबेट पोलीस दलात देशभरातील विविध भागांतून आलेले पोलीस कर्मचारीही आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील उमेदवारांसाठी मतदान केले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply