Breaking News

कामगार संघटनेच्या विस्तारित कार्यालयाचे रविवारी उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उद्घाटन रविवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता होणार आहे.
या सोहळ्यास उदघाटक म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार राजू पाटील, आमदार महेंद्र थोरवे, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबन पाटील, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विनोद पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभूदास भोईर, भाजप कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्यासह  नगरसेवक-नगरसेविका आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या सोहळ्यास कामगार क्षेत्रातील व्यक्तींनी उपस्थित रहावे, असे आवाहन राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी केले आहे.

Check Also

खारघरमध्ये नाट्यगृह उभारणीकरिता भूखंड द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची सिडकोकडे आग्रही मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये …

Leave a Reply