Breaking News

उरणमध्ये उघड्या विद्युत डीपींमुळे जीवितहानीची शक्यता

उरण ः वार्ताहर

उरण शहरातील मुख्य रस्त्यावरील वीज महावितरणच्या डीपी उघड्या असून त्यामुळे विजेचा शॉक लागून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे असतानाही वीज महावितरणच्या अधिकार्‍यांचे या गंभीर बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

उरण शहरातील वाणी आळी कॉर्नर, महात्मा गांधी पुतळ्यासमोरील प्रोफेशनल कुरिअरजवळ व रसवंतीगृहासमोरील बाजूस वीज महावितरणच्या विजेच्या दोन डीपी चार-पाच महिन्यांपासून उघड्या आहेत. त्यावरील झाकणे निघाल्याने आतील वीजपुरवठा करणार्‍या वायर दिसत आहेत. त्यामुळे लहान मुले, वयस्कर व्यक्ती तसेच त्या रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना विजेचा शॉक बसू शकतो.

या गंभीर समस्येकडे संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष देऊन त्वरित डीपींची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

Check Also

भिंगारी संघाने जिंकला नमो क्रिकेट चषक

पनवेल : रामप्रहर वृत्तनमो चषक 2025 अंतर्गत खारघर येथे झालेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत भिंगारी …

Leave a Reply