Breaking News

देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारच्या हर घर तिरंगा मोहिमेच्या बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने 13 ते 15 ऑगस्टदरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी ट्वीट केले आहे.
या वर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना हर घर तिरंगा चळवळीला बळ देऊया. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरोघरी तिरंगा फडकवा. या मोहिमेमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी फडकवलेल्या पहिल्या तिरंग्याचे छायाचित्रही त्यांनी ट्विट केले आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहिम आखली आहे. याबाबत ट्विटरवर माहिती देताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या मोहिमेद्वारे देशभरातील सुमारे 20 कोटी घरांवर तिरंगा फडकवला जाईल, जो प्रत्येक नागरिकाच्या मनात विशेषतः तरुणांच्या मनात देशभक्तीची अखंड ज्योत अधिक प्रज्वलित करण्याचे काम करेल.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply