Breaking News

गोलंदाज विनय कुमारची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणार्‍या विनय कुमारने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.
विनय कुमारची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ राहिलेली नसली तरी स्थानिक क्रिकेटमध्ये त्याचे नाव आदराने घेतले जाते. विनय कुमारच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघाने रणजी करंडकदेखील जिंकला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विनय कुमारने 41 सामने खेळले असून यात 49 विकेट्स घेतल्या आहेत. विनय कुमारच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर भारताचे माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांनीही विनय कुमारचे कौतुक केले आहे.
विनय कुमारने 2010 साली भारतीय संघात पदार्पण केले होते आणि त्याच सामन्यात रोहित शर्माने आपले पहिलेवहिले एकदिवसीय शतक ठोकले होते. दरम्यान, विनय कुमारसाठी वैयक्तिक पातळीवर त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना काही खास ठरला नव्हता.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply