Breaking News

विराट कोहलीकडून अश्विनची स्तुती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
तिसर्‍या कसोटीत भरताने इंग्लंडवर 10 गडी राखून विजय मिळवला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दुसर्‍याच दिवशी पाहुण्यांचा पराभव झाला. पहिल्या डावात इंग्लंडने 112, तर भारताने 145 धावा केल्या. दुसर्‍या डावात इंग्लंडचा डाव 81 धावांत आटोपून भारताला 49 धावांचे आव्हान मिळाले. हे आव्हान सलामीवीर रोहित शर्मा (25*) व शुबमन गिल (15) यांनी सहज पूर्ण केले. या सामन्यात 400 कसोटी बळींचा टप्पा पूर्ण करणार्‍या रविचंद्रन अश्विन याला विराट कोहलीने एक नवीन नाव देत त्याची स्तुती केली.
सामना संपल्यानंतर अश्विनच्या कामगिरीबद्दल बोलताना विराट म्हणाला, अश्विनने 400 कसोटी बळी घेणे मोठा पराक्रम आहे. प्रत्येक भारतीयाला अश्विनच्या कामगिरीचा अभिमान असायला हवा. यापुढेही अश्विनच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायल हवे. मी अश्विनला म्हटले होते की, 400 बळींचा टप्पा ओलांडल्यानंतर मी तुला ‘लेज’ नावाने हाक मारेन. अश्विन खरंच क्रिकेट विश्वातील महान खेळाडू आहे.
कसोटी क्रिकेट म्हणजे काय ते आता सगळ्यांना नव्याने समजले. संघात असूनही बुमराहला भरपूर विश्रांती मिळाली. 100वा सामना खेळत असूनही इशांतला अवघी काही षटके टाकायला मिळाली. वॉशिंग्टन सुंदरला केवळ तीन-चार चेंडू टाकायला मिळाले. संपूर्ण खेळ अक्षर व अश्विनभोवती फिरत होता. जडेजा संघात नाही म्हटल्यावर इंग्लंडचा संघ काहीसा गाफील राहिला आणि अक्षरने त्यांना बरोबर गुंडाळले, असे मजेशीर वक्तव्यही विराटने केले.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply