Breaking News

पॉइंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी

अहमदाबाद ः वृत्तसंस्था
मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात दुसर्‍या दिवशीच भारताने इंग्लंडला 10 गडी राखून पराभूत केले. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणतीही विकेट न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केले. या विजयासह टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे, मात्र अजूनही भारताला अंतिम तिकीट मिळलेले नाही.
इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत करून भारताने 71.0 टक्के गुणांसह पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तसेच इंग्लंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये 64.1 गुणांसह चौथ्या स्थानावर घसरला आहे. या टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया 69 टक्के गुणांसह तिसर्‍या स्थानावर आहे. यापूर्वी अंतिम तिकीट मिळवणारा न्यूझीलंड 70 टक्के गुणांसह दुसर्‍या स्थानावर आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा क्रीडा मेळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

उलवे नोड ः रामप्रहर वृत्तजनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर पब्लिक …

Leave a Reply