Breaking News

उरणमध्ये कोरोना रोखण्यासाठी जनजागृती मास्क आणि पत्रकाचे वाटप

उरण : वार्ताहर

येथील उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन व नवपरिवर्तन संस्था यांच्या वतीने नागरिकांना मास्क आणि कोरोना रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंदर्भातील पत्रकाचे वाटप शुक्रवारी (दि. 26) करण्यात आले. उरणमधील पालवी हॉस्पिटल चौक येथे हा उपक्रम राबविण्यात आला असून जनजागृतीही करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, त्याविषयी कोणती काळजी घ्यावी ह्या विषयी पत्रके वाटून त्याविषयी मार्गदर्शन देण्यात आले. कोरोना रुग्णसंख्येत होत असणारी वाढ पाहता पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी ही जनजागृती मोहीम घेण्यात आली आहे. उरण तालुक्यातील उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन ही डॉक्टर संघटना व सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणार्‍या नवपरिवर्तन संस्था यांच्यातर्फे पुढाकार घेऊन जनजागृती करण्यात आली.

या वेळी नवपरिवर्तन संस्थाचे तथा पत्रकार वीरेश मोडखरकर, पत्रकार घनश्याम कडू, गोपाळ पाटील, दिनेश पाटील, हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे, नरेश रहाळकर तसेच उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे डॉ. विकास मोरे, डॉ. सत्या ठाकरे, डॉ.सुरेश पाटील, डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. घनश्याम पाटील, डॉ. अजय कोळी, डॉ. प्राजक्ता कोळी, डॉ. राजेश भावसार, डॉ. प्रशांत बोंद्रे, डॉ. अतुल बोंद्रे, डॉ. सिप्पी, डॉ. सचिन गावंड, डॉ. संजय पर्हाड आदी उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply