Breaking News

‘मैं भी चौकीदार’; भाजपचा नवा प्रचार फंडा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, ‘चौकीदार चौर हैं’ला प्रत्युत्तर म्हणून ‘मैं भी चौकीदार’ अशी मोहीम सुरू केली आहे. शनिवारी (दि. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच या मोहिमेला आपल्या ट्विटर अकाऊंटवरून सुरुवात करून दिली.

‘तुमचा चौकीदार इथे उभा आहे आणि देशाची सेवा करतोय, पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजिक तेढ या विरोधात लढणारा देशातला प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी मेहनत करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय म्हणतोय-मीपण चौकीदार’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. या मोहिमेसाठी ‘हा, मैं भी चौकीदार हूँ’ हे गाणेही तयार करण्यात आले आहे.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply