Sunday , October 1 2023
Breaking News

क्रिकेट प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

‘आरटीआयएसी’मध्ये खेळाडूंना सुवर्णसंधी

उलवे नोड : रामप्रहर वृत्त

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगू लागले असताना देशभरात क्रिकेट फिव्हर आहे. अशातच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आरटीआयएससी)मध्ये नवोदित क्रिकेटपटूंसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आरटीआयएससीचे एमडी परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

आय थिंक स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीच्या वतीने आरटीआयएससीमध्ये आठ वर्षांवरील मुला-मुलींसाठी क्रिकेट प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहेत. या वर्गाचे उद्घाटन आरटीआयएससीचे संचालक रवींद्र भगत यांच्या हस्ते झाले. या समारंभास संचालक अभिजीत जाधव, मनोहर ओवळेकर, राजेश खारकर, प्रमुख क्रिकेट मार्गदर्शक उमेश पटवाल, प्रशिक्षक संतोष मटकर, सचिन सावंत, उपेंद्र यादव, अंबिका यादव उपस्थित होते.

या प्रशिक्षण वर्गांतर्गत क्रिकेटपटूंना शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवारी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत धडे देण्यात येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणार्‍यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

Check Also

वुशु स्पर्धेत रामशेठ ठाकूर विद्यालयाचे वर्चस्व; 11 सुवर्णांसह एकूण 32 पदकांची कमाई

खारघर : रामप्रहर वृत्त राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय अंतर्गत रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी …

Leave a Reply