Breaking News

काँग्रेसच्या नादाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपमानित करू नका

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई ः प्रतिनिधी

अनेक वर्षे शिवसेनेसोबत आणि मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. त्यामुळे त्यांना नको असला तरी फुकटचा सल्ला देतो की शेवटी सत्ता येते आणि जाते, पण जन्मभर इतिहास हे लिहून ठेवतो की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली. त्यामुळे कृपया काँग्रेसच्या नादी लागून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशा प्रकारे अपमानित करू नका आणि त्याकरिता लाचारी स्वीकारू नका, असे म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 28) पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

या वेळभ भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीदेखील उपस्थिती होती. या वेळी फडणवीस म्हणाले की, आताची परिस्थिती अशी आहे की सरकार लाचार आहे. लाचारी किती आहे बघा ज्या स्वातंत्र्यवीर सावरकारांसाठी कुठलेही बलिदान देण्याची तयारी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती, मात्र आज त्यांचे सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीला अभिवादनदेखील करीत नाहीत. एक ट्विट नाही, अभिवादनपर एक वाक्य नाही, ही केवढी लाचारी आहे. मला असे वाटते की काँग्रेसने तर जन्मभर स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्याय केलाच, पण त्याहीपेक्षा सत्तेच्या लाचारीमध्ये जो अन्याय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून होतोय त्याचे मला खरोखरंच आश्चर्य वाटत आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply