पनवेल : वार्ताहर
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेंतर्गत 18 लाख रुपये खर्चाच्या दिघाटी येथे नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमिपूजन सरपंच अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी उपसरपंच रोहिदास शेडगे, ग्रामपंचायत सदस्य मनोहर पाटील, वैशाली पाटील, ज्येष्ठ नेते चांगाजी पाटील, प्रमोद पाटील, पुंडलिक पाटील, केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा उपाध्यक्ष सुबोध ठाकूर, राजेश ठाकूर, विकास पाटील, लक्ष्मण ठाकूर, काळुराम गावंड, गजानन पाटील, शिपाई रामभाऊ पाटील, संखाराम पाटील तसेच दिघाटी ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.