Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीतून रस्त्यांचे काँक्रीटीकरण

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील देवद ग्रापंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि.11) झाले.
पनवेल मतदारसंघात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विकासकामांचा झंझावात सुरू आहे. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत 10 लाख रुपयांच्या निधीमधून देवदे येथे शिवनगर अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण तसेच 10 लाख रुपयांच्या निधीमधून शिवनगर येथे दत्त रेसीडेन्सी ते भगवान भंडारी यांच्या घरापर्यत्तच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी झाले.
या वेळी भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, भाजपनेते एकनाथ देशेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजपचे पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, तालुका चिटणीस यतीन पाटील, सरपंच विनोद वाघमारे, उपसरपंच साधना वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य संदिप वाघमारे, दिनेश वाघमारे, विजय वाघमारे, भगवान भंडारे, वासुदेव वाघमारे, प्रितम वाघमारे, प्रविण वाघमारे, कैलास वाघमारे, राम वाघमारे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply