Breaking News

पवारांकडून जातीचे राजकारण : आढळराव-पाटील

पुणे ः प्रतिनिधी

माझ्या 15 वर्षांच्या खासदारकीच्या काळात कोणाचीही जात काढली नाही, पण शरद पवार हे जातीचे राजकारण करतात, अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काल उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पुणे शहरातील रास्ता पेठ येथील नरपितगिरी चौकात सभा घेण्यात आली. या वेळी पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेत्या आमदार नीलम गोर्‍हे, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार महेश लांडगे, आमदार सुरेश गोरे तसेच आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर आढळराव पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक प्रश्नांवर भूमिका मांडली.

आढळराव पाटील म्हणाले की, मी प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी जातीपतीच्या राजकारणापासून दूर असून, माझ्याकडून असे काहीही होणार नाही, मात्र स्वतःला पुरोगामी म्हणणारे शरद पवार जातीचे राजकारण करतात, असा आरोप त्यांनी या वेळी केला. मागील तीन निवडणुकांपेक्षा यंदा मी सर्वाधिक मतांनी निवडून येईल, असा विश्वासही या वेळी अढळराव पाटील यांनी व्यक्त केला.

– भगवा व कमळाचीच

हवा -आदित्य ठाकरे

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक भागात जाऊन महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज आम्ही भरत आहोत, तसेच या निवडणुकीत आमच्या सर्वाधिक जागा जिंकतील, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला, तसेच राज्यात धनुष्यबाण आणि कमळाचीच हवा असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या वेळी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी बैलगाडीमधून येत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला.

Check Also

केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवा -मंत्री आदिती तटकरे

माणगाव : प्रतिनिधी महायुतीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ श्रीवर्धन विधानसभा …

Leave a Reply