Breaking News

हायवे मृत्यूंजयदूत योजनेला बोरघाटात प्रारंभ

खोपोली : प्रतिनिधी

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवरील बोरघाट पोलीस केंद्रात सोमवारी (दि. 1) हायवे  मृत्युंजयदूत योजनेची सुरुवात करण्यात आली.

एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. मात्र एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त व्यक्तीला प्रथम उपचार व पुढील उपचारासाठी कसे हलवायचे याचे प्रात्यक्षिक पवना ट्रॉमा केअर टीमने करून दाखविले. राज्याचे अप्पर वाहतूक पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली हायवे मृत्युंजयदूत योजना राबविण्यात येणार आहे. त्याच माध्यमातून सोमवारी बोरघाट पोलीस केंद्रात या मोहिमेला सुरुवातकरण्यात आली.

बोरघाट पोलीस केंद्रांच्या वतीने आठ टीम करण्यात आल्या असून, त्यात फिटर मकेनिक, टोविंग, ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, आयआरबी अफकोण, हॉटेल पेट्रोल पंप, अ‍ॅम्ब्युलन्स, पत्रकार आणि सोशल मेडिया अशा एकूण आठ टीम तयार करण्यात आल्या आहेत, जेणेकरुन अपघात घडल्यास त्यांच्या वतीने अपघातग्रस्त व्यक्तीला  तात्काळ उपचार मिळून जखमींचे प्राण वाचतील.

 खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पनवेल क्षेत्र महामार्ग पोलीस केंद्राचे सुदाम पाचोरकर, खोपोली पोलीस ठाण्याचे सतीश अस्वर, बोरघाट पोलीस केंद्राचे सहाय्यक निरीक्षक जगदिश परदेशी, उपनिरीक्षक महेश चव्हाण, अपघातग्रस्त टीमचे गुरुनाथ साठीलकर यांच्यासह आयआरबी टीम, देवदूत यंत्रणा,  बोरघाट पोलीस टीम, पवना ट्रॉमा केअर सेंटर टीम, क्रेन चालक, फिटर व स्थानिक ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply