Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामाला वेग

पनवेल : प्रतिनिधी

महानगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हलविण्याची कार्यवाही येत्या तीन ते चार दिवसांत केली जाणार आहे. शुक्रवारी  (दि. 5) आयुक्त सुधाकर देशमुख, महापौर डॉ. कविता चौतमोल व पालिका अधिकार्‍यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला भेट दिली व तेथे चालू असलेल्या सुशोभिकरण कामाची पाहणी करून आढावा घेतला. महानगरपालिका हद्दीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या चबुतर्‍याची उंची वाढवणे आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. याबाबतची आढावा बैठक आयुक्त सुधाकर देशमुख व महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस व महसुल विभागातील अधिकारी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली होती. सुशोभीकरणाचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या सभागृहात मंजूर झाला होता. या अनुषंगाने सुशोभीकरणाचे काम करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पुतळा हलविण्यासाठी संबधित संघटना आणि इतरांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता.पुतळा हा सुरक्षितरित्या असलेल्या ठिकाणाहुन पालिकेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील इमारतीत साधारण एक महिन्याकरीता आवश्यक सुरक्षा व्यवस्थेसह ठेवण्यात येणार आहे. या सुशोभिकरणाचे काम महिन्याभराच्या कालावधीत पूर्ण करून पुन्हा त्याच पुतळ्याची पुर्नस्थापना नव्याने होणार्‍या चबुतर्‍यावर करण्यात येणार आहे. याकामी हे काम एक महिन्याच्या कालावधीमध्ये चालू राहणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कामाच्या ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply