
पनवेल ः माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधत स्व. ह.भ.प. वासुदेव शेळके व स्व. डॉ. बुधाजी शेळके यांच्या स्मरणार्थ रविवारी पाली खुर्द येथे मर्यादित कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील यांच्या हस्ते झाले. युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे व अन्य उपस्थित होते.